बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (08:39 IST)

नागपूरमध्ये पावसाची हजेरी, शेतकरी चिंतेत

नागपूरमध्ये शुक्रवारी रात्री पाऊस आला असून या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर हवेमध्ये गारवा वाढला. याआधी पूर्व विदर्भातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. गुरुवारी सकाळी बहुतेक भागात वातावरण ढगाळलेले होते. सकाळी १० वाजेपर्यंत सूर्यदर्शनही झाले नाही. मात्र त्यानंतर वातावरण निवळले. दिवसा कुठेही पावसाची नोंद झाली नाही. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास मात्र नागपुरात पावसाने हजेरी लावली. 
 
या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा पसरला. हा पाऊस शेतकऱ्यांची चिंता वाढविणारा ठरला आहे. हरभरा, गहू या पिकांसाठी नुकसानकारक होण्याची  भीती आहे. 
 
आंब्याच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. या सोबतच वांगी, फुलकोबी, पत्ताकोबी या प्रकारच्या भाजीपाल्यावर किडींचा प्रकोप वाढण्याची शक्यताही या 
 
वातावरणामुळे वाढली आहे.