गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (15:47 IST)

आंदोलन करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी पोलिसांच्या ताब्यात

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सत्त्वशीला चव्हाण यांना पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात ताब्यात घेतलं. कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करताना पोलिसांनी कारवाई केली. 
 
“शेतकऱ्यांचे कायदे करणाऱ्यांना शेती कशी करतात हे माहिती आहे का? शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत की अदानी अंबानी यांच्या फायद्याचे आहेत?” असा जळजळीत सवाल सत्वशीला पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारला विचारला. दक्षिण कराड या मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाणांचे प्राबल्य राहिले आहे. सत्त्वशीला चव्हाणही कराड तालुक्यात चांगल्याच सक्रिय आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सत्त्वशीला चव्हाण मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं.