शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (19:30 IST)

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस

Maharashtra Weather and Pollution Report Today 11 June: महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये हवामानाचा मूड बदलला आहे. काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD)दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मुंबईसह अनेक भागात पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. त्यामुळे उन्हापासून मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या एक ते दोन दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवेचा दर्जा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये 'चांगल्या ते मध्यम' श्रेणीत नोंदवला जात आहे. महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये शनिवारी हवामान कसे असेल ते जाणून घेऊया.
 
मुंबई (Mumbai Weather Today)
शनिवारी मुंबईत कमाल तापमान 34 तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दुपारनंतर पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. हवेचा दर्जा निर्देशांक 'मध्यम' श्रेणीत 106 वर नोंदवला गेला आहे.
 
पुणे (Pune Weather Today)
पुण्यात कमाल तापमान 36 तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि पाऊस पडू शकतो. हवेचा दर्जा निर्देशांक 'मध्यम' श्रेणीत 125 वर नोंदवला गेला.
 
नागपूर(Nagpur Weather Today)
नागपुरात कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश अंशतः ढगाळ राहील आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. त्याच वेळी, हवा गुणवत्ता निर्देशांक 69 आहे, जो 'समाधानकारक' श्रेणीत येतो.
 
नाशिक (Nasik Weather Today)
नाशिकमध्ये कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दुपारनंतर पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. हवेचा दर्जा निर्देशांक 'चांगल्या' श्रेणीत 23 आहे.
 
औरंगाबाद (Aurnagabad Weather Today)
औरंगाबादमध्ये कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. येथील हवामान नाशिकसारखे असणार आहे. हवेचा दर्जा निर्देशांक 'समाधानकारक' श्रेणीत 58 आहे.