रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 मे 2021 (11:33 IST)

विदर्भात पुन्हा पावसाचा इशारा, हवामान विभागाने दिली माहिती

नागपूरच्या हवामान विभागाने विदर्भात पुन्हा पुढचे तीन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. १२ मे ते १४ मे या दरम्यान पाऊस वर्तविला आहे. दरम्यान, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढलेला होता.
 
नागपुरातील मंगळवारच्या तापमानात १.४ अंश सेल्सिअसने वाढ होऊन ४० अंश तापमानाची नोंद करण्यात आली. सकाळी उष्णतामान कमी असले तरी दुपारनंतर ते वाढले. सकाळची आर्द्रता ६१ टक्के तर सायंकाळी ४१ टक्के नोंदविण्यात आली. सायंकाळीही वातावरणात उष्णता कायम होती.
 
विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पारा वाढलेला जाणवला. गोंदियामध्ये ०.३ अंशाने तापमानात किंचित घट होती. तिथे ३८.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. या सोबतच, बुलडाणा ३८.२, गडचिरोली ३९.२, नागपूर ४० वाशिम आणि अमरावती ४१, वर्धा ४१.९, अकोला ४२.६ आणि चंद्रपूरमध्ये ४२.८ अंश सेल्सिअस अशी नोंद झाली. मागील २४ तासांमध्ये वर्धा जिल्ह्यात २.१ मिमी तर ब्रह्मपुरीमध्ये १.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.