शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (14:12 IST)

Raj Thackeray : राज ठाकरे यांचा ओवेसीच्या वक्तव्यावरुन सवाल, नूपुर शर्मा यांचं राज ठाकरे यांनी समर्थन केलं

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समर्थन केलं आहे. मुंबईमध्ये पक्षाचा पदाधिकाऱ्यासंमोर दिलेल्या भाषणामध्ये राज यांनी भारतामधून फरार झालेल्या झाकीर नाईकचा उल्लेख करत नुपूर शर्मा यांचं समर्थन केलं आहे.नुपूर शर्मा यांनी केलेल्या विधानावरुन त्यांना सबंध जगभरातील मुस्लिम बांधवांची माफी मागावी लागली होती. एवढेच नाही तर त्यांच्या विरोधात एक आंदोलनच पेटले होते. त्या जे काही बोलल्या होत्या त्या झाकीर नाईकच्या मुलाखती मधलेच होते. त्यांनी दिलेल्या वक्त्यव्यावर एवढा गदारोळ झाला तर मग ओवैसी आमच्या देवतांना मनहूस म्हणतात त्यांच्यावर का कारवाई किंवा माफी मागण्याची वेळ का येत नाहीं ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.  या देशात अनेक चांगले मुसलमान आहे. ओवेसी सारख्या लोकांमुळे देशातील वातावरण गढूळ होते कारण हे देशात जातीवाद निर्माण करतात. असे ही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसोबत बोलताना, “आजपर्यंत आपण जेवढी आंदोलनं केली तेवढी इतर कोणत्याही पक्षाने केलेली नाहीत,” असं म्हटलं. पुढे राज यांनी, “मशिदीवरचे भोंगे काढा भोंगे काढा किती वर्ष सुरु होतं. पण या भोंग्यांना आपण पर्याय दिला. एक तर भोंगे काढा किंवा आम्ही तिथे येऊन हनुमान चालिसा म्हणू. सगळ्यांनी भोंगे काढायला सुरुवात केली. आता मुस्लीम समाजातील अनेकजण सांगत आहेत की ते बरं वाटतं कानाला. असंख्य आंदोलनं झालेली आहेत. तुम्ही हे लोकांना सतत सांगितलं पाहिजे. तुम्ही कसले दबून राहता?” असा सवाल केला.

पुढे याच संदर्भातून राज यांनी नुपूर शर्मां संदर्भातील वादावर भाष्य केलं. “त्या नुपूर शर्मा बोलल्या. त्यांना काढून काय टाकलं. माफी काय मागितली सगळ्यांची. मी बाजू घेतली त्यांची. त्या स्वत:च्या मनातलं बोलत नव्हतं. जे होतं ते (बोलत होत्या)”, असं म्हणत राज यांनी नुपूर शर्मांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. तसेच पुढे राज यांनी भारतामधून फरार झालेला मुस्लिम धर्मोपदेशक आणि इस्लामिक रीसर्च फाउंडेशनचा संस्थापक झाकीर नाईकचा उल्लेख केला. “तुमचा तो नाईक कोण? झाकीर नाईक त्याची मुलाखत बघा. झाकीर नाईक तर मुस्लमान आहे. झाकीर नाईकच्या एका मुलाखतीत त्याने तेच सांगितलं आहे जे नुपूर शर्मा बोलत होत्या,” असंही राज भाषणामध्ये म्हणाले.