गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (16:14 IST)

‘माझी जीवनगाथा’, असं म्हणत राज ठाकरे यांचे सूचक ट्वीट,

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण वाचण्याचा सल्ला दिला होता.त्याला राज ठाकरेंनी पुण्यातील पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर देत प्रबोधनकार आणि दिवंगत यशवंत चव्हाण यांची पुस्तकं वाचली आहेत, असा टोला हाणला होता. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सूचक ट्वीट केलं आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या माझी जीवनगाथा या पुस्तकातील संदर्भ देणारं ट्वीट केलं आहे.
 
“जिथे चिकित्सा-स्वातंत्र्य नाही, तिथे बौध्दिक विकास नाही.जिथे बौध्दिक विकासाला बंदी, तिथे राज्यकर्त्यांनी समाज-विकासावर मोठमोठी व्याख्याने देणे, म्हणजे बांडगुळानेच झाडाचं रक्त शोषणं होय!”- प्रबोधनकार ठाकरे, ‘माझी जीवनगाथा’, असं ट्वीट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.
 
राष्ट्रवादीच्या उदयानंतर महाराष्ट्रात जातीवाद वाढीस लागला, राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली. मनसे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्य फैरी झडू लागल्या आहेत. अजूनही वेगवेगळ्या नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया येतच आहेत. काहीजण राज यांच्या वक्तव्याचं समर्थन करत आहेत तर काहींनी राज यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. राज्यातील जातीपातीच्या राजकारणाविषयी बोलत असताना त्यांनी याला राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरलं होतं. “राज्यात जातीचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा झालाय. राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला”, असं राज ठाकरे म्हणाले होते.