सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जानेवारी 2022 (14:31 IST)

रणजित सिंह डिसले गुरुजींचा परदेश जाण्याचा मार्ग मोकळा, राज्य शालेय शिक्षण मंत्री कडून मंजुरी

रणजित सिंह डिसले गुरुजींना तांत्रिक अडचणींमुळे परदेश जाण्याची परवानगी मिळाली नव्हती. अखेर डिसले गुरुजींचा परदेश जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यांना अमेरिकेत जाण्याची परवानगी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. आता मात्र रंजितसिंग डिसले यांना परदेश गमनाचा मार्ग मोकळा झाला आहे.  डिसले गुरुजींना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची परवानगी मिळाली आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी डिसले गुरुजींचा रजेचा अर्ज  स्वीकारून त्यांना परदेशात जाण्यासाठी रजा द्यावी असे आदेश शिक्षण विभागाला दिले आहे. तसेच वर्षा गायकवाड यांनी डिसले गुरुजींचा वादामागील कारण आणि चौकशी करण्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यांच्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करून त्यांना 25 जानेवारी पर्यंत परदेशात जाण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे  सांगण्यात आले आहे.  या विषयाबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वतः फोन केल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी रणजित सिंह डिसले यांचे अभिनंदन वर्षा गायकवाड यांनी केले आहे.