शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 4 एप्रिल 2022 (21:57 IST)

एसटीमध्ये 52 कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती

ST driver suicide
रत्नागिरी जिह्यामध्ये एसटी संपामुळे होत असलेले प्रवाशांचे हाल लक्षात घेता एसटीकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांची  भरती करण्यात येत आह़े  जिह्यात आतापर्यंत 52 कंत्राटी कर्मचारी भरती करून घेण्यात आले आहेत़ दोन दिवसाच्या ट्रेनिंगनंतर हे कर्मचारी प्रत्यक्ष कामावर हजर होवू लागले आहेत़ यामुळे एसटीच्या फेऱया वाढण्यास मदत झाली आह़े
 
  हजर झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यां मध्ये मंडणगड-4, दापोली 4, खेड 4, चिपळूण 6, गुहागर 8, देवरूख 5, रत्नागिरी 12, लांजा 4, राजापूर 5 आदी कर्मचारी हजर करून घेण्यात आले ओहत़ एक वर्षाचे कंत्राट या कर्मचाऱयांकडून करून घेतले जात आहे. पुढील काही दिवसात आणखी कंत्राटी कर्मचारी हजर करून घेतले जाणार आहेत़ त्याचप्रमाणे वाहकांसाठी नव्याने भरती प्रक्रियाही राज्य शासनाकडून प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती एसटीच्या रत्नागिरी विभागाकडून देण्यात आली.
 
  जिह्यात रविवारी एसटीच्या 400 हून अधिक फेऱया सोडण्यात रत्नागिरी विभागाला यश आल़े  एसटीचे चालक व वाहक मोठय़ा संख्येने कामावर हजर होत असल्याचे दिसत आह़े  जिह्यात आता एकूण 900 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत़ राज्यभर कर्मचारी संपावर ठाम असताना रत्नागिरीत कर्मचारी कामावर हजर राहत आहेत़ असे असले तरी चालक-वाहक कामावर हजर रहावेत, यासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांकडून  सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत़