शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (16:26 IST)

एसटी संपामुळे खासगी कॅब, ट्रॅव्हल्सकडून सर्वसामान्य प्रवाशांची लूट

राज्यभरातील एसटी कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. एसटी कामगार संघटना आणि राज्य सरकार यांच्यात बोलणी सुरू आहे. मात्र, त्याचा सर्वाधिक फटका पुणे, मंबईतून दिवाळीनिमित्त गावाकडे गेलेला नागरिकांना बसत आहे. सोमवार (दि.८) पासून पुन्हा ते मुंबई-पुण्याकडे परतू लागले आहेत. मात्र, खासगी कॅब, ट्रॅव्हल्सने सर्वसामान्य प्रवाशंची लूट सुरू केली आहे.
 
एसटी गाड्यांचे मुंबई, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद उस्मानाबाद, बीड, लातूरसाठी साधरण २०० ते ५०० रूपयांच्या दरमान्य भाडे आहे. मात्र, संपामुळे प्रवाशांना आपआपल्या गावावरून पुणे, मुंबईकडे येण्यासाठी अक्षरश: लूट सुरू झाली आहे. खासगी ट्रॅव्हल्स, कॅब वाल्यांनी याचा गैरफायदा घेत गाडीभाड्यात तिप्पट-चौपट दर केले आहे.
 
खासगी ट्रॅव्हल्सचे वाढीव दर
 
शिवाजीनगर ते अमरावती १५०० रूपये
पुणे ते उस्मानाबाद ११०० रूपये
पुणे ते लातूर १२०० रूपये
पुणे ते बीड १००० रूपये
पुणे ते वर्धा १२०० रूपये
पुणे ते नाशिक ५०० ते ६०० रूपये
पुणे ते नागपूर १५०० ते १८०० रूपये
पुणे ते औरंगाबाद ७०० रूपये
पुणे ते मुंबई ६०० ते ७००