सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (10:28 IST)

वानखेडे प्रकरणावरून रोहित पवारांचा केंद्राला टोला

समीर वानखेडे प्रकरणावरून राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये वातावरण प्रचंड तापलंय. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना आता, रोहित पवारांनी या याप्रकरणाचा धागा पकडत केंद्र सरकारला टोला लगावला आहे.
 
केंद्र सरकारनं यंत्रणांचा गैरवापर करण्यासाठी राजकीय हेतू त्यांना बळ दिलं. मात्र, अधिकाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा वापर सुरू केल्याचं दिसत आहे, असं रोहित पवार म्हणाले.
अशा प्रकारे अधिकाऱ्यांकडून केला जाणारा अधिकारांचा वापर पाहता, केंद्र सरकारचंच या अधिकाऱ्यांवर नियंत्रण राहिलं नसल्याचं दिसत आहे, असा टोला रोहित यांनी लगावला.
 
मलिक यांनी वानखेडेंवर आरोप करत सादर केलेले बहुतांश पुरावे खरे असल्याचं दिसत आहे. त्यामुळं आगामी महिनाभरात त्यांच्यावर केंद्राकडून कारवाई झालेली दिसेल, असंही रोहित पवार म्हणाले.