एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याची सदावर्ते यांनी कबुली,सरकारी वकिलांचा दावा
गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याची सदावर्ते यांनी कबुली दिल्याचा सरकारी वकिलांनी दावा केला आहे. दरम्यान, कोल्हापूर पोलीसांनी त्वरित सदावर्ते यांचा ताबा मिळावा म्हणून कोर्टात अर्ज केला आहे. तर दुसरीकडे साताऱ्यातील एका प्रकरणात सदावर्ते यांना जामीन मंजूर झाला आहे.
गुणरत्न सदावर्ते यांना 26 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर साताऱ्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात त्यांना जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी प्रत्येक एसटी कर्मचा-याकडून 550 रुपये घेतल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. तर सदावर्तेंनी कोर्टात स्वत:ची बाजू मांडताना सर्व आरोप खोडून काढलेत. कोर्टाच्या कामकाजासाठी पैसे घेतल्याचा त्यांचा दावा आहे.