शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जानेवारी 2020 (10:20 IST)

उदयनराजे भोसले यांना मोठा दिलासा, लोणंद प्रकरणी निर्दोष मुक्तता

साताऱ्याचे माजी खासदार आणि भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांची एका प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लोणंद येथील सोना अलाईन्स कंपनीच्या व्यवस्थापकाला मारहाण प्रकरणात उदयनराजे भोसले यांना मोठा दिलासा मिळाला असून यांच्यासह १२ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
 
२०१७ मध्ये साताऱ्यातल्या लोणंदमध्ये सोना अलाईन्स नावाच्या कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना मारहाण करुन २४ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप उदयनराजे भोसले यांच्यावर लावण्यात आला होता. या आरोपानंतर राजकुमार जैन यांनी २३ मार्च २०१७ रोजी उदयनराजे भोसलेंसह ९ जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी सातारा जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम सुनावणी झाली असून कोर्टाने याप्रकरणी उदयनराजेंसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.