1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (19:44 IST)

नाशिक शहरात कलम १४४ लागू

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर निर्बंध घालण्यासाठी नाशिक शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तसेच दिवसा जमावबंदी आणि संचारबंदी लागू केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येवरती कोरोना निर्बंध लावले जात आहेत. त्यामुळे नाशिक  शहरामध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी नवे सुधारित आदेश दिले आहेत.
नाशिक पोलिसांच्या आदेशानुसार जलतरण तलाव , ब्युटी पार्लर  स्पा सेंटर, वेलनेस सेंटर पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार असून शहरातील सर्व उद्याने, किल्ले, प्राणी संग्रहालये आणि पर्यटन स्थळंदेखील पूर्णवेळ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान खासगी कार्यालयात ५० टक्के उपस्थिती अनिवार्य असून कामाचे विभाजन २४ तासात करण्याचा उल्लेख य़ा सुधारीत आदेशामध्ये केला आहे. खासगी कार्यालये २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी दिली आहे.