शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (16:29 IST)

खळबळजनक : नामवंत डॉक्टरने पत्नी आणि दोन मुलांसह केली आत्महत्या

कर्जत तालुक्यातील राशीन येथे मुलाचे आजारपण सहन होत नसल्याने एका नामवंत डॉक्टरने त्याची पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. डॉ. थोरात यांनी पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 
 
ही घटना शनिवारी पहाटे घडली आहे. गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. दरम्यान ज्या खोलीत त्यांचे मृतदेह आढळले त्या खोलीच्या दरवाजाला त्यांनी चिठ्ठी देखील लावली होती. त्या चिठ्ठीत डॉक्टरांनी असे लिहिले आहे की, 'माझा थोरला मुलगा (18) कृष्णा याला ऐकण्यास कमी येत असल्याने आम्हाला समाजात अपराधासारखे वाटत आहे. अनेक दिवसापासून आम्ही यामुळे व्यथित होतो.'
 
त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, 'कृष्णाचेही कशात मन लागत नाही. हे दु:ख आम्ही आई-वडील म्हणून सहन करू शकत नाही. त्यामुळे मी आणि माझी पत्नी वर्षा वय (39) आत्महत्येसारखे कृत्य करत आहोत. हे योग्य नसेल तरी नाईलाजावास्तव हे कृत्य करीत आहोत. त्यात कुणालाही जबाबदार धरू नये.'
 
दरम्यान एका प्रतिष्ठित डॉक्टर कुटुंबांने असे पाऊल उचलल्याने अनेकांच्या मनात संशय देखील निर्माण झाला आहे.  पोलीस या प्रकरणात आता ही आत्महत्या आहे की घातपात याचा कसून तपास करत आहेत.