रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018 (09:17 IST)

शरद पवार, राज ठाकरे यांचा विमानातून एकत्र प्रवास, राजकीय चर्चेला उधाण

राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि मनसेप्रमुख राज ठाकरे हे औरंगाबादहून एकाच विमानातून मुंबईकडे रवाना झाले आहेत. शदर पवार आणि राज ठाकरे यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळाच चांगलीच चर्चा रंगली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या जवळीकतेमुळे अनेकांच्या भुवया उंचाविल्‍या आहेत.
 
मनसेप्रमुख राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून विदर्भ दौऱ्यावर होते. हा दौरा आटोपल्यानंतर आज राज ठाकरे औरंगाबाद येथे आले होते. तेथे ते संध्याकाळी मुंबईकडे रवाना झाले. विशेष म्‍हणजे याच विमानातून शरद पवार प्रवास करत होते. शरद पवार आणि राज ठाकरे हे एकाच विमनातून प्रवास करत असल्याने त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. याआधी राज ठाकरे यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतल्‍यापासून या दोघांची जवळीक वाढल्‍याचे बोलले जात आहे.