सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 जून 2023 (21:40 IST)

शरद पवार वैचारिक व्हायरस…. तर राजकारणातून खल्लास होतील- गुणरत्न सदावर्ते

gunratna sadavarte
शरद पवार एक वैचारिक व्हायरस असून तो निर्जंतुक करण्यासाठीच एसटी सहकारी बँकेच्या निवडणुकीत उतरलो असल्याचा खुलासा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. शरद पवार यांची आर्थिक नाडी बंद केल्यानंतर ते राजकारणातून खल्लास होतील असेही ते म्हणाले. तसेच कोल्हापूरात हिदुत्ववादी कार्यकर्त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले असून आता हसन मुश्रीफ यांचे काही चालु देणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
 
कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आज पत्रकार परिषद घेतली. आपल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टिका करताना ते म्हणाले, “शरद पवार एक वैचारिक व्हायरस आहे. त्याला निर्जंतुक करणे यासाठीच मी एसटी सहकारी बँकेच्या निवडणुकीत उतरलो आहे. आपली एसटी जनसंघ संघटना पुर्ण ताकदीने उतरणार आहे. शरद पवार यांची सत्ता बाजूला करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. शरद पवार यांनी चालक- वाहक यांना कधी उमेदवारी दिली नाही. आम्ही कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी निवडणुकीत उतरलो आहोत. आमच्या सोबत 33 हजार मराठा असून सर्वात जास्त उमेदवार मराठा समाजातून दिले आहेत” असे ते म्हणाले.
 
कोल्हापूरात उसळलेल्या दंगलीवर भाष्य करताना ते म्हणाले, “कोल्हापूरमध्ये दंगलीवेळी काही हिंदू तरुण लांबून पाहत होते त्यांची गुन्ह्यात नावं आली आहेत. याबाबत मी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांशी बोलणार असून पोलिसांनी दाखल घेतलेले गुन्हे मागे घेतले पाहिजे. हसन मुश्रीफ यांचे देखील आम्ही काही चालू देणार नाही.” असे ते म्हणाले.
 
तसेच “देश ही भूमिका पहिल्यांदा आम्ही घेतलीय. लव्ह- जिहादच्या संदर्भाने मुंबईत आम्ही सगळयात मोठा मोर्चा काढला. लव्ह- जिहाद, लँड- जिहाद नंतर आता व्हॉट्सअप- जिहाद सुरू झालं आहे. याबाबत अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्य़ाबरोबर पत्रव्यवहार करणार असून पोलीस यंत्रणेला देखील याबाबत पत्राने कळवणार आहे.” असेही ते म्हणाले.