गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 एप्रिल 2023 (13:57 IST)

शिंदे-फडणवीस सरकार पडणार नाही-अजित पवार

ajit pawar
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर असून, लवकरच हे सरकार पडेल, अशा वावडय़ा अनेक नेत्यांकडून उठवल्या जात आहेत. मात्र, त्यात तथ्य नाही. वस्तूस्थिती मान्य करायला हवी, असे म्हणत अजित पवारांनी विधानसभेतील संख्याबळाचे गणितच मांडले.
 
अजित पवार म्हणाले, माझा स्वतःचा जो अभ्यास आहे, जे थोडे बहुत ज्ञान मला आहे. त्या आधारावर सांगतो की, शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर नाही, हे सरकार पडणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांना अपात्र ठरविले तरी सध्याच्या सरकारकडे असणाऱ्या आमदारांची संख्या 149 राहते. विधानसभेच्या एकूण 288 आमदारांमधून 16 आमदार कमी केले तर 272 एवढी आमदारांची संख्या गृहीत धरली जाते. 272 पैकी 136 ला बहुमत राहते, त्यामुळे आपणच ठरावा काय ते. ही वस्तुस्थिती आहे, मान्य करायला हवी. कारण नसताना वावडय़ा उठविण्याचे काम सुरू आहे, असेही ते म्हणाले.
 
Edited By -Ratnadeep Ranshoor