सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जानेवारी 2021 (07:34 IST)

येत्या ३० जानेवारीला शिर्डी बंद

शिर्डी संस्थानने ग्रास्स्थांना लागू केलेल्या जाचक नियमांविरोधात ग्रामस्थ एकवटले असून ३० जानेवारी रोजी गाव बंद ठेवून मोर्चा, उपोषणचा मार्ग अवलंबविण्यात येईल असा इशारा सर्वपक्षीयांच्यावतीने कैलास कोते, डॉ. एकनाथ गोंदकर, कमलाकर कोते, अभय शेळके, निलेश कोते यांनी दिला आहे.
 
संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या कार्यपध्दतीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. भाविकांना बाहेर जाण्यासाठी तीन व चार क्रमांकाचे दरवाजे बंद करण्यात आल्याने साईमंदिराच्या पूर्वेला व दक्षिणेला असलेली बाजारपेठ अक्षरशः ओस पडली. व्यापारयांमध्ये असंतोष खदखदतो आहे. हे दरवाजे भाविकांना बाहेर जाण्यासाठी खुले करावेत. ग्रामस्थांसाठी सुलभ दर्शन व्यवस्था करावी. भाविकांसोबतची लहान मुले व ज्येष्ठ मंडळींसाठी व्यवस्था करावी या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी बंदचा इशारा दिला आहे.