शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 मे 2022 (09:31 IST)

बाबरी पडली तेव्हा शिवसैनिक तिथे होते -केंद्रीय मंत्री नारायण राणे

narayan rane
बाबरी पडली तेव्हा शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यावेळी तिथे होते की भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याठिकाणी होते यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी या वादात उडी घेतली आहे.

मी तिथे गेलो नव्हतो, पण शिवसैनिक बाबरी पडली तेव्हा तिथे होते असा खुलासा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.
 
उद्धव ठाकरे तेव्हा अदृश्य होते, ते राजकारणात नव्हते असंही नारायण राणे म्हणाले आहेत.
 
मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, "मी स्वत: त्या ठिकाणी गेलो नाही कारण मला गर्दीत चेंगरुन जाण्याची भीती होती. बाबरी पडताना त्या ठिकाणी शिवसैनिक उपस्थित होते. पण उद्धव ठाकरे त्या वेळी राजकारणातही नव्हते, ते अदृश्य होते."