रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 18 सप्टेंबर 2022 (10:21 IST)

शिवसैनिकांना चुन-चुन के मारणारा जन्माला यायचाय - अंबादास दानवे

"शिवसैनिकांना गिनके आणि चुनके मारणारा अजून जन्माला यायचा आहे. दादागिरीला दादागिरीनेच उत्तर देणार," असा इशारा शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना दिला आहे. बुलडाणा येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.
 
"कोणी मोजायला आलंय का?" असा सवाल विचारत दानवेंनी भाषणाची सुरुवात केली. "कुणीतरी इथे येऊन आधी गिनून घ्या आणि एखाद्याला चुनून घ्या. तोच कार्यकर्ता तुमच्याकडे पाठवतो. मग पाहतो कोण भारी ठरते ते," अशा शब्दांत दानवे विरोधकांवर बसरले.

"इथले आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू कोंबत होते. मग आता तुम्हाला तुमच्या बॅनरवर फडणवीस कसे चालतात?" असा सवाल दानवेंनी गायकवाडांना विचारला.
 
"बुलडाण्यात दादागिरी चालते. पण शिवसैनिकांनो घाबरू नका. दादागिरीला दादागिरीने उत्तर देऊ," असेही दानवे म्हणाले.