बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 24 ऑगस्ट 2020 (16:31 IST)

संभाजी बिडीचे नाव बदला, अन्यथा १ सप्टेंबरपासून महाराष्ट्रभर आंदोलन

बिडीला संभाजी महाराजांचं नाव देणं आणि त्याची विक्री करणं हा संभाजी महाराजांचा अपमान असल्याने संभाजी बिडीचे नाव आता बदलण्यात यावं, अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनने केली आहे. महाराष्ट्रात गेली ८० वर्षांपासून संभाजी बिडी या नावाने धूम्रपान उत्पादन केले जात आहे. परंतु छत्रपती संभाजी महाराज यांची युद्धनीती, लेखन, संपूर्ण जगाला माहिती आहे. असं असताना जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात त्यांच्या नावाने बिडी उत्पादन होतं असून या बिडीवर महाराजांचे नाव असून त्याची विक्री केली जात आहे. तो कागद फाडून फेकला जातो.
 
त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान होतं आहे, हा अवमान सहन केला जाणार नाही. यासाठी या बिडी उत्पादन करणाऱ्या कंपनीने नाव बदलून निर्मिती करावे, अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनकडून आता करण्यात येत आहे. जर या संबंधीत कंपनीने नाव जर बदलले नाही तर १ सप्टेंबरपासून महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बिडीचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला देण्यात आला आहे.