बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जून 2018 (09:05 IST)

विधान परिषद निवडणूक चारपैकी दोन जागा शिवसेनाने जिंकली

कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, तर मुंबई शिक्षक आणि नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या जागांचा निकाल जाहीर झाला आहे. चार जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल अखेर जाहीर झाला आहे.कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरे यांनी विजय मिळवला. मुंबई पदवीधरमध्ये शिवसेनेच्या विलास पोतनीस यांनी बाजी मारली. तर मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे कपिल पाटील यांनी विजयी हॅटट्रिक केली. तिकडे नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या किशोर दराडेंनी मोठा विजय मिळवला आहे. हे सर्व निकाल रात्री फार उशिरा आले आहेत. विधानपरिषदेतील मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सेनेनं आपली टाकत कायम ठेवली आहे. चारपैकी दोन जागा शिवसेनेने, एक भाजप आणि एक लोकभारती पक्षाने जिंकली आहे. त्यामुळे शिवसेनेचे पारडे जड झाले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरे, मुंबई पदवीधरमध्ये शिवसेनेच्या विलास पोतनीस, मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे कपिल पाटील, नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या किशोर दराडेंनी मोठा विजय मिळवला आहे.