मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 8 ऑगस्ट 2021 (12:34 IST)

धक्कादायक ! तलावात बुडून तिघांचा दुर्देवी अंत

सोलापुरातील बोरामणी परिसरात दावल भागातील एका तलावात बुडून तिघांचा दुर्देवी अंत झाल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे.ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.सोलापुरातील शेख कुटुंबावर हा दुःखदायक प्रसंग आला आहे. 
 
शेख आणि इतर कुटुंबातील काही लोक बोरामणी येथील दावल मलिक दर्गाच्या परिसरात गेले असताना रिहाना पाण्याच्या तलावाजवळ हात पाय धुण्यासाठी गेली असताना तिला पाण्याच्या अंदाज आला नसल्याने ती पाण्यात बुडू लागली.तिला वाचविण्यासाठी दोघे जण पाण्यात उतरले मात्र त्यांना देखील पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्या तिघांचा बुडून दुर्देवी अंत झाला.  
 
मोहम्मद हारुण सलीम शेख वय वर्ष 41,यासीन हारुण शेख वय वर्ष 35 आणि रिहाना तौफिक पिरजादे वय वर्ष 35 असे मयत झालेल्यांची नावे आहेत.संबंधित तिघेही विडी घरकुल कुंभारी येथील रहिवासी आहेत. शेख हे दोघे सख्खे बंधू होते.मयत झालेले तिघे एकाच गावातील रहिवाशी असल्याने गावात या घटने विषयी हळहळ व्यक्त केली जात आहे.  
 
नागरिकांच्या आणि पोलिसांच्या साहाय्याने मृत देह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.या घटनेमुळे त्यांच्या गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद केली आहे.पुढील तपास सुरु आहे.