शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 23 ऑगस्ट 2023 (12:35 IST)

Solapur: मोहोळ जवळ अपघातात 4 महिला भाविकांचा मृत्यू

मोहोळ जवळच्या यावली गावाजवळ माल वाहू ट्रक आणि कारची धडक होऊन झालेल्या अपघातात चार  जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली आहे. 
 
रांजणगावातील काही महिला भाविक कार मधून तुळजापूर साठी निघाल्या असता पुणे सोलापूर महामार्गावर यावली गावाच्या जवळ सोलापूरला जाणाऱ्या मालवाहू ट्रकला कारची मागून जोरदार धडक झाली. धडक एवढी जोरदार होती की त्यात तीन महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला.तर चार महिला भाविक जखमी झाले आहेत.  

घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह गाडीतून काढण्यात आले आणि जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले असून मृतांची ओळख पेटवण्याचे काम सुरु आहे. 
 
Edited by - Priya Dixit