बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 ऑक्टोबर 2021 (09:36 IST)

अहमदनगरमध्ये जागा खाली करण्यासाठी गुंडांची दहशत

अहमदनगरमध्ये जागा खाली करण्याची सुपारी घेऊन एक राजकीय महिला पदाधिकारी व काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी पाईपलाईन रोड, समर्थ नगर येथील एका खासगी जागेचा ताबा घेण्यासाठी जेसीबीने संरक्षक भिंतीचे प्रवेशद्वार तोडून जागा खाली करण्यासाठी दहशत माजवली. या धक्कादायक प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली होती. सदर प्रश्‍नी काही दिवसांपुर्वी आरपीआयच्या वतीने उपोषण देखील करण्यात आले होते, मात्र संबंधितांवर कारवाई झाली नसल्याने त्यांचे धाडस वाढून त्यांनी कायदा हातात घेतला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
तर आरपीआयच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट केले आहे. सदर व्यक्तींवर कारवाई होण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने युवकचे जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले.
 
याबाबत अक माहिती अशी कि, सावेडी, पाईपलाईन रोड, समर्थ नगर येथील एका जागेत राम माने व लक्ष्मण माने अनेक वर्षापासून राहत आहे. काही महिन्यांपासून शहरातील एका राजकीय पक्षाची पदाधिकारी असलेली गुंड प्रवृत्तीच्या महिलेने ही जागा खाली करुन घेण्याची जागा मालकाकडून सुपारी घेतली. त्यानुसार माने कुटुंबीयांना सदर जागा खाली करण्यासाठी सदर महिला व गुंड प्रवृत्तीचे लोक त्रास देण्यास सुरुवात केली आहे. जेसीबी लावून घर पाडून टाकण्याच्या धमक्या देण्यात आल्यानंतर आरपीआयच्या वतीने पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करुन उपोषण करण्यात आले होते.
मात्र याची दखल घेतली न गेल्याने सबंधितांनी जेसीबी लाऊन जागा खाली करण्याचा प्रयत्न केला. सदर कुटुंबाला पोलिस संरक्षण द्यावे व अनाधिकृतपणे जेसीबीने संरक्षक भिंतीचे प्रवेशद्वार तोडून जागा खाली करण्यासाठी दहशत निर्माण करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.