शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 जुलै 2021 (11:32 IST)

मुख्यमंत्री राज्यभरातील आढावा घेणार, टास्क फोर्सची बैठक, निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात चर्चा होणार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य सरकारकडून लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची बैठक सुरु असून यात राज्यभरातील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
 
येत्या एक ते दोन दिवसांत सरकार निर्बंध शिथिल करण्याची घोषणा करू शकते. मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करून ठाकरे सरकार अतिशय खबरदारी बाळगत असल्याचे दिसून येत आहे.
 
बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की मुख्यमंत्र्यांनी आमच्या विभागाला अभ्यास करण्यास सांगितले आहे व त्याबाबत अहवाल देण्यास सांगितले आहे. अहवाल सादर केल्यानंतर यावर 2 ते 3 दिवसांत निर्णय घेण्यात येईल. असे देखील राजेश टोपे यांनी सांगितले.