बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 ऑगस्ट 2019 (10:32 IST)

वाद दुसऱ्यांचा गोळीबारात निष्पाप माणसाचा जीव गेला

पुणे येथील हडपसर परिसरातील गंगानगर येथे झालेल्या गोळीबारात एका निष्पाप व्यक्तीचा मृत्यू झाला असून, त्यांचे नाव पंचया सिध्या स्वामी(वय 60) असे आहे. यातील गुंड असलेले मयूर गुंजाळ आणि तेजस कल्याणी या दोघांमधील वादामुळे या तिसऱ्या निष्पाप व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.
 
मयूर गुंजाळ आणि तेजस कल्याणी या दोघांमध्ये जुन्या भांडणातून रस्त्यात मारामारी होत पुन्हा वाद सुरु झाला, वादाचे रुपांतर गोळीबारात झाले. कल्याणी याने मयूर गुंजाळ याच्या दिशेने गोळीबार केला. यात  नेम चुकला आणि ही गोळी थेट फूटपाथ वरून जात असणाऱ्या वयोवृद्ध स्वामी यांच्या पायाच्या पंजाला लागली. त्यानंतर त्यांना तत्काळ नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, मात्र त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने हॉस्पिटलमध्येच त्यांचे निधन झाले आहे. घटनास्थळी हडपसर पोलिस स्टेशनचे अधिकारी पोहचले असून पुढील तपास सुरू आहे.