रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 14 नोव्हेंबर 2021 (10:05 IST)

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा अभ्यास करून शासन सकारात्मक निर्णय घेईल - अनिल परब

एसटी महामंडळ शासनामध्ये विलीनकरण करण्यासाठी गेले काही दिवस संपकरणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी मोठा दिलासा दिला आहे.
एसटी कामगारांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीचा अभ्यास करून शासन सकारात्मक निर्णय घेईल.
 
तसेच विलीनीकरणसंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीला आपला अहवाल लवकर देण्याबाबत सांगण्यात येईल. समितीने विलीनीकरणाची शिफारस केल्यास ती आम्हाला मान्य असेल, असेही आश्वासन ॲड. परब यांनी संपकरी एसटी कामगारांच्या शिष्टमंडळाला आज दिले.
 
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ), रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी शनिवारी (13 नोव्हेंबर) ॲड. अनिल परब सह्याद्री अतिथीगृह यांची भेट घेतली. यावेळी परब यांनी वरील आश्वासन दिलं