शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 जून 2023 (21:36 IST)

व्हाट्सअप स्टेटसमुळे अवघ्या काही तासात मनमाड पोलिसांनी सहा वर्षाच्या रोनक केले पालकांच्या स्वाधीन

whats app
मनमाड  : सोशल मीडियाचा गैरवापर होत असल्याचा सध्या ओरड असले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टीही घडत असतात असाच अनुभव मनमाडकर यांना आला असून हरवलेल्या मुलाचा फोटो सोशल मीडियाच्या व्हाट्सअप स्टेटसला आणि सोशल मीडियाला सोडताच अवघ्या काही मिनिटात सुखरूप पालकांच्या स्वाधिन घटना आज घडली.
 
या घटनेबद्दल अधिक माहिती अशी की ,रेल्वे स्थानकावर असलेल्या पुलावर एक मूल रडत असल्याचे लक्षात येताच पुलावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने मुल कोणाचे आहे अशी विचारपूस केली. मात्र कोणीच सांगायला तयार नाही. त्यामुळे सदर मुलाला रेल्वे स्थानकाच्या बाहेर आणून त्यास खाद्यपदार्थ घेऊन दिला.
 
त्यानंतर त्यास मनमाड पोलिस स्थानकात जाऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. आई वडील दिसत नसल्यामुळे मुलगा रडत होता. काही सांगत नव्हता शेवटी पोलिसांनी मुलाचा फोटो काढून व्हॉट्सप ग्रुपवर व्हायरल केले असता तेथून नागरिकांनी, तरुणांनी सदर माहिती आणि मुलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. जो तो मुलाची माहिती शेअर करू लागला. अनेकांनी मुलाचे फोटो आणि माहिती स्टेटसला ठेवले होते.
 
सोशल मीडियावर मुलगा हरविल्याबाबत माहिती प्रसारित केली. हरवलेला मुलगा हा महानंदा नगर येथील मिस्तरीचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी तातडीने त्यांना कळवले तर घरा बाहेर खेळणारा मुलगा कुठेच दिसत नल्याने घरचे हैराण झाले होते. सर्वत्र शोध घेणे सुरू होते. मात्र वडिलांना फोन आल्यामुळे मुलाचे आई वडील यांनी थेट पोलिस स्थानक गाठले असता मुलगा रडत पोलिसांच्या जवळ असल्याचे दिसताच त्यांनी पोराला मोठी मारली.
 
पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात, पोलिस संदीप वणवे, सुनील पवार यांनी खात्री केल्यावर मुलाचे वडिल रामप्रसाद चौहान यांच्या ताब्यात दिले. मनमाड पोलिस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधान व सजगतेमुळे अवघ्या काही तासांमध्येच सार्थकला त्याच्या पालकांचा शोध घेता आला. हरवलेल्या रोनकला सुखरूप सुपूर्त केल्याबद्दल चौहान कुटुंबीयांनी मनमाड पोलिसांचे आभार मानले.