सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन जनतेने केल्याने कोरोना संख्या आटोक्यात येतेय - नवाब मलिक
मुंबई - महाराष्ट्रात आणि देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असून सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन केल्याने हे घडल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.
राज्यात सध्या दहा जिल्हयांना पहिल्या टप्प्यात जास्त सूट देण्यात आली आहे. काही जिल्हयात निर्बंध आहेत तर काही जिल्हयात जास्तच निर्बंध लागू आहेत. लोकांनी सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन केले तर लवकरात लवकर आपण कोरोनातून मुक्त होवू असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.
जे दहा जिल्हे पहिल्या टप्प्यात आहेत. त्यातील लोकांनी नियमांचे पालन केले नाही तर ते दुसर्या किंवा तिसऱ्या टप्प्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून नियमांचे काटेकोर पालन करा असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे.