रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 एप्रिल 2021 (09:10 IST)

प्रतिमहा दहा लाख नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दीष्ट, आयुक्तांच्या बैठकीत निर्णय

देशभरात 1 मे पासून 18 वर्षापुढील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. महिनाभरात 10 लाख लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले असल्याची माहिती पिंपरीचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.
 
शहरात 45 वर्षांपुढील सुमारे तीन लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आगामी काळात कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी शहरातील संपूर्ण नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येणार असुन पुढील महिन्याभराच्या कालावधीत सुमारे १० लाख लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आखले आहे. यासाठी शहरात सुरु असलेल्या लसीकरण केंद्रांव्यतिरिक्त प्रभागनिहाय प्रत्येकी चार असे आणखीन ६० अतिरिक्त केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत.
 
नागरिकांना ने-आण करण्यासाठी रिक्षा वाहतुकीची व्यवस्था करण्यात येणार आहे. नगरसेवक व प्रशासन प्रतिनिधी यांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात येणार असुन प्रतिकेंद्र २०० लोकांची नोंदणी करुन लसीकरण करण्यात येणार आहे. सद्या शहराला दर दिवसा १८ ते २० हजार लस उपलब्ध होतात. १ मे पासुन ४० ते ५० हजार लस उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. लॉकडाऊन काळात या मोहिमेत कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये, तसेच लसीकरण ठिकाणी गर्दी होवू नये, सुरळीतपणे लसीकरण व्हावे यासाठी पोलिस प्रशासनाची मदत घेतली जाणार आहे.