महाराष्ट्रात पहिलीपासूनच्या शाळा सुरु होणार
राज्यातील शहरी भागात 8 ते 12वी आणि ग्रामीण भागात पाचवी ते 12वीचे वर्ग सुरू झाले आहेत. आता राज्यात पहिलीपासूनच्या शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. पहिलीपासूनचे वर्ग सुरू कऱण्यास शालेय शिक्षण विभाग अनुकूल असल्याची माहिती समोर आली आहे. पहिलीपासूनच्या सर्व शाळा येत्या 10 ते 15 दिवसांत सुरू होण्याचे संकेत मिळेत मिळत आहेत.
या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता मिळाल्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं वृत्त आहे. कोरोना कृती दल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेनंतर याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत सर्व शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.