बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 मार्च 2022 (14:52 IST)

राज्य सरकार दाऊदच्या दबावाखाली काम करत आहे : फडणवीस

विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बमुळे महाविकास आघाडीतील अनेक नेते अडचणीत आले आहेत. फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला लक्ष्य केले. ते म्हणाले की कालपर्यंत तुम्ही सभागृहात सांगत होता की नवाब मलिक यांच्याबद्दल उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. पण आज तर उच्च न्यायालयाने ईडीची कारवाई योग्य असल्याचे म्हटलंय. मग आता माझा सवाल आहे की दाऊदच्या माणसाबरोबर संगनमत करून आर्थिक गैरव्यवहार करणारे मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा सरकार कधी घेणार? जर राजीनामा घेण्यात आला नाही तर राज्य सरकार दाऊदच्या दबावाखाली काम करतयं हे स्पष्ट आहे. असा आरोप यावेळी फडणवीस यांनी केला.
 
यावेळी फडणवीस यांनी सरकारकडून विरोधकांवर होत असलेल्या कारवाईचा समाचार घेतला. असल्या कारवाईला आम्ही घाबरत नाही. कितीही गुन्हे दाखल करा आम्ही न्यायालयात जाऊ. पण भ्रष्टाचाराविरोधात बोलत राहू. कितीही खोटे गुन्हे दाखल करा. आम्ही त्याची पर्वा करत नाही. लोकशाहीला पायदळी तुडवण्याचे काम सरकार करतय. पण सरकारला सांगू इच्छितो की जो खड्डा खणतो तोच त्या खड्ड्यात पडतो.