शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: अलिबाग , बुधवार, 13 सप्टेंबर 2023 (08:09 IST)

रायगड जिल्ह्यातील अनधिकृत घरे अधिकृत करण्याची संधी मिळणार

जिल्ह्यातील अधिकृत घरे बांधकाम करणार्‍यांसाठी आज साकारात्मक बाजू जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पुढे आणली आहे. ज्या लोकांना अशा नोटीसा गेल्या असतील त्यांना आपले घर अधिकृत करण्याची संधीदेखील देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बेकायदा रिसॉर्ट तसेच धनदांडग्यानी केलेल्या बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही यांनी यावेळी म्हटले आहे.
 
तुमचे स्वःताच्या शेतात बांधलेले घर अनधिकृत असू शकते..? रायगड टाइम्सने याबाबतचे वृत दिल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. सोमवारी (11 सप्टेंबर) शांतता कमिटीच्या बैठकीत रायगडचे खासदार सुनिल तटकरे जिल्हाप्रशासनावर चांगलेच संतापले. सणासुदीच्या काळात सामान्या जनतेला या नोटीसा देवून तुम्हाला काय साध्य करायचे आहे? असा सवाला त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांना विचारला. यावेळी आपण नियमाप्रमाणेच काम करत असल्याचे म्हसे यांनी सांगितले.
 
पावसाळी अधिवेशनामध्ये काही सदस्यांनी रायगड जिल्ह्यातील बेकायदा बांधकामांचा मुद्या उपस्थित केला होता. त्यानंतर आलेल्या निर्देशानुसार ही कार्यवाही आपण करत असलो तरी, गरजेपोटी बांधलेली कोणाचीही घरे तोंडण्याचा यामागे हेतू नाही. मात्र जे लोेक अधिकृतपणे राहत आहेत, त्यांना नोटीसा गेल्या आहेत. ज्यांना नोटीस आली असेल, त्यांना आपले घर अधिकृत करण्याची संधीदेखील असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
तहसील कार्यालयाकडून घराचे बांधकाम केलेल्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे तसेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशी कारवाई करण्याआधी लोकप्रतिनीधींकडे बोलणे केले असते तर कोणाचेही गैरसमज होणार नाही. असे मत खा.तटकरे यांनी व्यक्त केले. यावर गरजेपोटी बांधलेल्या घर आणि अनधिकृत धनदांडग्यानी केलेली बांधकामे अशी दोन भागांमध्ये यांची विभागणी करु असे यावेळी डॉ. म्हसे यांनी सांगितले.