सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 मार्च 2021 (20:27 IST)

मंत्रिमंडळातील बदलाबाबत कुठली चर्चा होणार नाही : जयंत पाटील

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख  मंत्रिपदाचा राजीनामा देतील अशी राजकीय चर्चा  सुरू असतांना  राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांची बैठक पार पडली.  दरम्यान, मंत्री जयंत पाटील माध्यमांशी बोलताना मोठा खूलासा केला. ते म्हणाले की, मनसूख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे सुरू होता. या प्रकरणी सरकार कुणाला ही पाठीशी घालत नाही. गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा देणार अशा वावड्या उठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याबाबत कसलेही अंदाज बांधण्याची गरज नाही. शरद पवार आणि मुख्यमंत्री यांची भेट झाली ती पूर्वनियोजित होती. या भेटीवेळी दोघांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली, असं सांगितले.
ते पुढे म्हणाले की, अनिल देशमुख गृहमंत्री म्हणून व्यवस्थित काम करत आहेत. राष्ट्रवादीच्या बैठकीत गृहमंत्री बदलण्याबाबत प्रस्ताव नाही. मंत्रिमंडळातील बदलाबाबत कुठली चर्चा होणार नाही, असाही त्यांनी यावेळी खुलासा केला.