शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 मे 2022 (14:56 IST)

हे हिंदुत्त्व नाही, कायद्याचा विषय आहे : संजय राउत

sanjay raut
भोंगे हा विषय नाही, भोंग्यापेक्षा महत्त्वाचे विषय देशात आहेत. भोंग्यांना पॉवर कुणाची आहे हे देशाला माहिती आहे. हे हिंदुत्त्व नाही, कायद्याचा विषय आहे. कायद्याच्या चौकटीतील विषय आहे, असा टोला संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लगावला आहे.
 
संजय राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, भोंगे हा विषय नाही, भोंग्यापेक्षा महत्त्वाचे विषय देशात आहेत. भोंग्यांना पॉवर कुणाची आहे हे देशाला माहिती आहे. हे हिंदुत्त्व नाही, कायद्याचा विषय आहे. कायद्याच्या चौकटीतील विषय आहे. सुप्रीम कोर्ट, न्यायालयल आणि पोलीस यांचा विषय आहे. तुम्हाला काहीचं काम नसल्यानं याविषयावर बोलत असाल तर हे राष्ट्रहिताचं नाही. राष्ट्रीय एकात्मतेला ते मारक आहे. भोंग्यामुळे कुणाला त्रास होऊ नये, यासाठी आम्ही आंदोलनं केली आहेत, लढाई केली आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने काही निर्णय दिले आहेत. या देशात जर कायद्याचं राज्य आहे. तर प्रत्येकानं कायद्याचं पालन केलं पाहीजे.
 
सीबीआयने केलेल्या तपासाची पानं या लोकांनी तपासावीत. केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल तपासावा. त्यामध्ये शिवसेना कुठे आहे, असे विचारणारे अज्ञानी लोकं आहेत सगळे, त्यांना कळेल की नक्की त्यावेळी शिवसेना कुठे होती आणि शिवसेना काय करत होती. राम मंदिर उभं राहतय. तसेच वातावरण बदललेलं आहे. प्रश्न बदललेले आहेत. अशा वेळी मूळ प्रश्नावरचं लक्ष दूर करण्यासाठी भाजपा नेते आणि त्यांचे गुप्त साथीदार याकडे सर्वांना आकर्षित करण्याचं काम करतायत.पण लोकं त्यामध्ये पडणार नाहीत. देवेंद्र फडणवीसांना इतक्या वर्षांनी फुलबाजे उडवायला काय झालं? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.