शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (15:11 IST)

नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याची ही आहे स्थिती

maharashatra dam
जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये एप्रिलमध्ये ८६ टक्के साठा आहे. आतापर्यंत आळंदी, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर ही नऊ धरणे १०० टक्के भरली आहे. गेल्या पावसाळयात गंगापूर, आळंदी,वाघाड, दारणा, भावली, वालदेवी, कडवा, नांदूरमध्यमेश्वर, हरणबारी, केळझर, नागासाक्या, माणिकपुंज यासह बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली होती. यावर्षीही हीच स्थिती आहे. गंगापूर धरणाचा साठा ७५ टक्के तर समुहात ८३ टक्के साठा आता आहे.