सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 एप्रिल 2023 (07:57 IST)

अजित पवारांकडून जीवाला धोका; भाजप पदाधिकाऱ्याची पोलिसात तक्रार

ajit pawar
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार भाजप पदाधिकारी रवींद्र साळगावकर यांनी खडक पोलीस ठाण्यात दिली आहे.
 
साळगावकर हे पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघातील भाजपचे पदाधिकारी आहेत. गणेशखिंड रस्त्यावर ई स्क्वेअरच्या समोर एक प्लॉट आहे. या मोकळ्या प्लॉट संदर्भात मोजणी न करण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही बळजबरीने मोजणी केली जात होती. या प्लॉटचा ताबा सध्या साळगावकर यांच्याकडे असल्याने त्यांना सतत धमकी येत आहे. याबाबत हवेली तहसीलदार यांच्याकडेही यापूर्वी अर्ज दाखल केला आहे. तसेच चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यातही अर्ज दिला आहे. मात्र, यामध्ये अजित पवार यांचे नाव असल्याने शासकीय अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे साळगावकर त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor