शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑक्टोबर 2024 (14:11 IST)

विवाहितेला आत्महत्या करण्यास भरीस पाडण्याच्या आरोपाखाली तीन जणांना अटक

महाराष्ट्रातील ठाण्यामध्ये एका विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार ठाणे मध्ये एका महिलेने 16 ऑक्टोंबरला फाशी घेत आत्महत्या केली. त्यानंतर तिच्या आईने बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. 
 
पोलीस अधिकारींनी सांगितले की, मृत विवाहितेचा पती, दीर आणि सासर्याला अटक करण्यात आली आहे. तक्रारीनुसार पीडितेला तिच्या सासरच्या मंडळींनी बांधून ठेवले होते तसेच तिच्या कडून तिचे सर्व दागिने काढून घेतले होते. तसेच पीडितेला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. यामुळे तिने आत्महत्या केली. तसेच या प्रकरणात पीडितेची सासू आणि नणंद देखील सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.