शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 डिसेंबर 2021 (15:39 IST)

अल्पवयीन मुलीला झालेली भूतबाधा काढण्यासाठी कुटुंबीयांकडून रुपये घेतले आणि नंतर

अल्पवयीन मुलीला झालेली भूतबाधा काढण्यासाठी तिच्या कुटुंबीयांकडून आठ हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला. यानंतरही मुलीला फरक पडला नाही म्हणून तक्रादारांनी पैसे परत मागितले म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली.
 
अंधश्रद्धेच्या नावाखाली लूट केल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली. सावेडी उपनगरातील वैदूवाडीमध्ये १८ नोव्हेंबरला रात्री हा प्रकार घडला.
याप्रकरणी मंगळवारी, ७ डिसेंबरला तोफखाना पोलिस फिर्याद ठाण्यात दाखल झाली. अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अविनाश धनगर, आरती अविनाश धनगर (रा. वैदूवाडी, भिस्तबाग चौक), एका अनोळखी पुरुषाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
 
पोलिसांनी अविनाश धनगर व आरती धनगर यांना अटक करून त्यांना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दोघांना १० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
फिर्यादी अल्पवयीन मुलीच्या आईने आपली मुलगीसारखी फाशी घेण्याचा प्रयत्न करते, म्हणून तिला आरोपींकडे नेले होते. आरोपींनी मुलीच्या अंगात एका फाशी घेतलेल्या मुलीची भूतबाधा झाल्याचे सांगितले. आरोपींनी भूतबाधा काढण्याच्या नावाखाली होम करून कोंबडी कापली. त्यासाठी आठ हजार रुपये घेतले.हा विधी एका मांत्रिकाने केला. नंतर आरोपींनी मुलीच्या अंगातील भूतबाधा गेल्याचे सांगितले. पण तरीही मुलीच्या मनातील विचार जात नव्हते.त्यामुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याचे तिच्या कुटुंबियांच्या लक्षात आले. आरोपींकडे पैसे परत मागितले असता त्यांना मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले.