बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (16:13 IST)

टोपे यांचे रुग्णालयातून विद्यार्थ्यांना भावनिक पत्र

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकेवर काढले आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील रुग्णालयातून विद्यार्थ्यांना भावनिक पत्राद्वारे आवाहन केले आहे. तसेच कोरोनाविरोधातील लढाई लढण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांकडे मदतीची मागणी केली आहे.
 
प्रिय विद्यार्थी मित्रांनो, शाळा, महाविद्यालये नुकतेच सुरु झाले आणि कोरोना नुकताच वाढताना दिसतोय. कोरोना विरुद्ध लढाई गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. तुमच्या सर्वांच्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मदतीने ही लढाई आपण नक्कीच जिंकणार यात शंका नाही. तुमच खेळण्याचं, बागडण्याच हे वय क्रिडागंणावर घाम गाळण्याच हे वय. परंतु, गेले वर्षभर तुम्हाला घरातच बसाव लागल कोरोनावर मात करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. ती अशी की, प्रथम तुम्ही तुमचीच काळजी घ्या. त्याचबरोबर आपल्या आई-वडिलांची, भाऊ-बहिणीची आणि शेजार्‍यांची ही काळजी घ्या. आई-वडिलांना कामानिमित्त बाहेर जाव लागत. बाहेरुन आल्यावर त्यांनी हात-पाय स्वच्छ धुतलेत का नाही ते पहा. त्यांनी बाहेर जाताना मास्क लावला का नाही ते पहा. सॅनिटाझर वापरल का नाही ते देखील पहा. शासनाने ठरवून दिलेले नियम पाळले जातात का नाही ते पहा. जर कदाचित कोरोनाचे काही लक्षण दिसलेच तर लगेच सरकारी दवाखान्यात त्यांना घेऊन जा. त्यांची काळजी घेण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. मित्रांनो, आजचा विद्यार्थी आणि तरुण देशाचा उद्याचा आधारस्तंभ आहे. तरुणाच शरीर सुदृढ, मन सकारात्मक आणि बुद्धी सतेज पाहिजे तरच त्याला योग्य वेळी, योग्य निर्णय घेता येतात. तेव्हाच तो जीवनात यशस्वी होतो. तर मग चला मला करणार ना मदत. मला तुमची खात्री आहे. आपण ही लढाई नक्कीच जिंकणार!’