रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 मार्च 2020 (16:36 IST)

कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे मंदिर बंद, चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द

कोरोनाचा वाढता धोका पाहता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. तुळजाभवानी देवीची चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे 5 वाजल्यापासून मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी बंद असणार आहे.
 
तुळजाभवानी मंदिर संस्थानने निर्णय जाहीर करताना देवीच्या धार्मिक पूजा आणि विधी हे देवीचे महंत आणि पाळीकर पुजारी हे करतील. मात्र, 4 पेक्षा जास्त पुजारी उपस्थित राहणार नाहीत, याची दक्षता घेतली आहे.
 
देवीची चरण तीर्थ, प्रक्षाळ पूजा आणि अभिषेक पूजा या भक्तांसाठी बंद असतील असे तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक योगिता कोल्हे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थांचे अध्यक्ष दिपा मुंडे मुधोळ यांचे पुढील आदेश येईपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे. तुळजाभवानी देवीची 5 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान होणारी चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द करण्यात आली आहे .