गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 जानेवारी 2019 (16:36 IST)

लोकलमध्ये जुळ्यांचा जन्म

मुंबईच्या लोकलमध्ये एका महिलेची प्रसुती झाली. या महिलेने चक्क जुळ्यांना जन्म दिला. महत्त्वाचं म्हणजे एका बाळाचा जन्म धावत्या लोकलमध्ये सफाळे स्टेशनजवळ तर दुसऱ्या बाळाचा जन्म पालघर रेल्वे स्टेशनच्या प्रतीक्षालयात झाला.
 
संबंधित महिला प्रसुतीसाठी विरार-डहाणू लोकलने सफाळेवरुन पालघरकडे जात होती. त्यादरम्यान धावत्या लोकलमध्येच तिला प्रसववेदना सुरु झाल्या. लोकलमध्येच तिने मुलीला जन्म दिला. त्यानंतर लोकल सुटल्याने तिला पालघर रेल्वे स्थानकापर्यंत तसंच प्रवास करावा लागला. पालघर रेल्वे स्थानकात बाळ आणि बाळंतीण महिलेला रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रुममध्ये हलवण्यात आलं. तिथे या महिलेने आणखी एका बाळाला जन्म दिला. आधी मुलीला नंतर मुलाला अशा जुळ्या बाळांना या महिलेने जन्म दिला.