रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 11 जानेवारी 2021 (17:33 IST)

काय म्हणता 'ती' पत्नी, त्या पोझिशनमुळे तरूणाच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट

नागपूरमध्ये पॉर्न फिल्म पाहून वेगवेगळ्या पोझिशन करुन बघण्यात एका तरुणाचा गळफास लागून मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे. मयत तरुणाचे आरोपी तरुणीसोबत कोर्ट मॅरेज झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तरुणाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर तरुणीवर गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. 
 
मयत 26 वर्षीय तरुण इंजिनिअर होता, मात्र सध्या त्याच्यावर बेरोजगारीची वेळ आली होती. कुटुंबीयांच्या संमतीने तरुणाचे लग्न झाले असून त्यांना मुलगा आहे. आरोपी 20 वर्षीय तरुणीसोबत त्याचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोन वर्षांपूर्वी त्याने तरुणीशी कोर्ट मॅरेजही केले होते, मात्र याविषयी कोणालाही माहिती नव्हती.
 
तरुणी बाथरुमबाहेर आली, तोपर्यंत तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. प्राथमिक तपास करत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती, मात्र युवकाच्या वडिलांच्या तक्रारीवरुन तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्या मुलाची हत्या झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. यानंतर पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे.