बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020 (07:34 IST)

उदयनराजे भोसले यांची चोरीला गेलेली चांदीची बंदूक सापडली

खा. उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानातून एकाने तब्बल २ किलो वजनाची शोभेची चांदीची बंदूक चोरी केली. या घटनेची माहिती सातारा शहर पोलिस ठाण्यातील पोलिसाला मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेत चांदीची बंदूक जप्त करण्यात आली.
 
याबाबत प्राथमिक माहिती अशी, सोमवारी दुपारी एकजण चांदीची बंदूक विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सातारा शहर पोलिस ठाण्याचा कर्मचारी भुसुंगे यांना मिळाली. त्यानुसार ते जुना मोटार स्टँड परिसरात गस्त घालत असताना संशयित निदर्शनास आला. याची माहिती शाहूपुरी पोलिस ठाण्यातील डीबी पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करून संशयिताला ताब्यात घेतले व शोभेची बंदूक जप्त केली.