बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 डिसेंबर 2020 (08:47 IST)

या सरकारचं चौथं चाक हे जनतेच्या विश्वासाचं आहे : मुख्यमंत्री

महाविकास आघाडी सरकारवर सुरुवातीला तीन चाकाचं सरकार म्हणून टीका झाली. हे तीन चाकाचं सरकार टिकणार नाही, असंही बोललं गेलं. पण विरोधकांना हे लक्षात आलं नाही की या सरकारचं चौथं चाक हे जनतेच्या विश्वासाचं आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेनं दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले आहेत. महाविकास आघाडी सरकारचा वर्षपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते. 
 
“गेल्या वर्षभरात जे आमचं टीमवर्क झालं आहे. ते पाहिल्यानंतर हे सर्व माझे सहकारी त्यात सर्व अनुभवी आहेत. अनुभव नसणारे कोणी नसतील असं त्यांच्या कामावरुन वाटतंच नाही. सगळेच जण फार छान काम करत आहेत. वर्षभरापूर्वी अनेकांना असं वाटतं होतं की हे सरकार अस्तित्वाच येऊच शकत नाही. शिवसेनेला ते गृहित धरुन चालत होते. की शिवसेना फरफटत येणारच. पण शिवसेना कधीही फरफटत जाण्याऱ्या पक्षापैकी आधी नव्हती, उद्याही नसेल आणि कधीच नसणार,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावलं.