राजे हे काय सुरु आहे, टोलचा ठेका महाराजांच्या वारसात वाद
साताऱ्यातील दोन्ही राजे अर्थात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात आणेवाडी टोलनाक्यावरील वर्चस्व वादातून मध्यरात्री चांगलाच राडा झाला आहे. यामध्ये दोघांच्या समर्थकांनी अनेक वाहनांची तोडफोड केली आहे. याबरोबरच आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरुची बंगल्याजवळ गोळीबार झाल्यामुळे वाद चिघळला आहे. यामध्ये खासदार उदयनराजे यांनी थेट शिवेंद्रराजे भोसलेंच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला होता.त्यामुळे आमदार शिवेंद्रराजे भोसले समर्थकांनी उदयनराजे समर्थकांच्या सात गाड्या फोडल्या आहेत. त्यामुळे पूर्ण राज्याला प्रश्न पडला आहे की एका टोल नाक्यावरून दोन राजे अवघ्या राज्याची लायकी काढत आहेत.आणेवाडी टोलनाका बारा वर्षापासून उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडे होता. रिलायन्स कंपनीनं टोलनाका उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांच्या काढून घेतला असून तो आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या समर्थकांच्या ताब्यात दिला त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.