गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 16 जुलै 2024 (12:12 IST)

डोंबिवलीतील भाजीवाल्या आईची मेहनत फळाला आली, मुलगा झाला CA, पहा भावूक व्हिडिओ

महाराष्ट्रातील डोंबिवली येथे भाजी विकणार्‍या मावशींचा मुलगा CA  बनला आहे. जेव्हा रिजल्ट लागला तेव्हा तो आपल्या आईजवळ गेला आणि आईला मिठी मारली. यादरम्यान आजूबाजूच्या लोकांना समजल्यानंतर त्यांनी देखील शुभेच्छा दिल्यात. मुलगा सीए झाला म्हणून भाजी विकणाऱ्या आईला खूप आनंद झाला.
 
देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया-
या मुलाचे नाव योगेश ठोंबरे आहे, हा मुलगा आपल्या आईसोबत खोनी गावात राहतो. तसेच या मुलाने मिळवलेल्या यशामुळे त्याला सर्वानी शुभेच्छा दिल्या असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीसांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
 
या मुलाची आई डोंबिवलीमधील गांधीनगर परिसरात भाजी विकून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करते. त्या गेल्या 25 वर्षापासून भाजी विकत आहे, कुटुंबाची परिस्थिती खूप गरिबीची होती. अशामध्ये या मुलाने अभ्यास करून सीए ची परीक्षा पास केली आहे.  दृढ निश्चय आणि खूप मेहनत यावर योगेश ठोंबरे ने हे घवघवीत यश मिळवले आहे.

आपल्या जबाबदारीची जाणीव असल्याने मावशींनी भाजीविक्रीच्या कामात एक दिवसही व्यत्यय येऊ दिला नाही. तीन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर आहे, एक मुलगी आणि दोन मुलगे, एक मुलगा आणि एक मुलगी विवाहित आहे. धाकटा मुलगा योगेश शाळेत हुशार होता, अभ्यासात वेगवान होता आणि त्याच्या मेहनतीच्या जोरावर त्याने सीएची कठीण परीक्षा पास केली.