सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 मे 2024 (00:02 IST)

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार वादग्रस्त विधानामुळे कायदेशीर दृष्टया अडचणीत आले माघार घेतली

विजय वडेट्टीवार यांनी 26/11 च्या मुंबई हल्ल्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. दहशतवादी अजमल कसाब याने पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांची हत्या केली नसून आरएसएसशी संबंधित असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याला गोळ्या घातल्याचं त्यांनी म्हटलं होतं. उज्ज्वल निकम हे देशद्रोही आहेत.अशा देशद्रोहीला भाजपने तिकीट दिले. असं वक्तव्य करणारे विजय वडेट्टीवार हे अडचणीत आले आहे. त्यांच्या वक्तव्यावर उज्ज्वल निकम यांनी पलटवार केला आहे. त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी केली आहे. 

ते म्हणाले, कसाबच्या गोळीने मुंबई पोलिसांचे तीन धाडसी अधिकारी शहीद झाले. त्यापैकी हेमंत करकरे होते. खुद्द कसाबने न्यायालयात हे वक्तव्य केले आहे. काँग्रेसला कसाबचे विधान खोटे सिद्ध करायचे आहे का? कसाब आणि अबू इस्माईलने अनेक निष्पाप लोकांवर गोळीबार केला होता. खुद्द कसाबने न्यायालयात याची कबुली दिली आहे. त्याच आधारावर कसाबला शिक्षा झाली. आता तुम्ही म्हणताय सगळे खोटे? कसाबचे वक्तव्य खोटे होते का?सध्या विरोधी पक्षात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे ते माझ्यावर चुकीचे आरोप करत आहे. विजयवडेट्टीवार यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा तयारीत असून निवडणूक आयोगात वडेट्टीवारांच्या विरुद्ध तक्रार झाली. भाजपने त्यांच्या विरुद्ध मोर्चा काढला. 

वडेट्टीवार यांनी स्वतःला अडचणीत असलेलं पाहून आपण केलेल्या विधानापासून माघार घेतली असून त्यांनी माजी पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांनी आपल्या पुस्तकात असं लिहिलं आहे असं म्हटलं मी फक्त ते पत्रकारांना सांगितले. हे वक्तव्य माझे नसून त्या पुस्तकात लिहिलेले आहे. असा दावा वडेट्टीवार यांनी केला. 
 
Edited By- Priya Dixit