रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 डिसेंबर 2022 (14:39 IST)

नांदेड जिल्ह्यातील सहा तालुक्यातील गावांनी तेलंगणात जाण्याची इच्छा व्यक्त केली

Nanded
नांदेड सीमावर्ती भागात  सुविधा देण्याची ओरड करूनही महाराष्ट्र शासन गांभीर्याने घेत नसल्याने जिल्ह्यातील सहा तालुक्यातील गावांनी तेलंगणात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कृती समितीही स्थापन करण्यात आली असून, हा प्रश्न चिघळू शकतो.  
 
२०१८ पासून प्रश्न मांडत आहोत. चार हजार कुटुंबीयांचे तेलंगणात झालेले स्थलांतरही शासन थांबवू शकले नाही. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ, असे समितीचे गोविंद मुंडकर यांनी सांगितले.
 
कोणते तालुके, काय आहेत मागण्या?
 
१६ तालुके असलेल्या नांदेड जिल्ह्यात माहुर, उमरी, देगलूर, बिलोली, किनवट, धर्माबाद हे सहा तालुके तेलंगणाला जोडून आहेत. रस्ते, वीज, पाणी यासारख्या समस्या येथे आहेत. तेलंगणातील नागरिकांना सर्व सुविधा मिळतात. तेथील सरकार मजूर, नोकरदार आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी राहते, असे या भागातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मोफत वीज, पाणी, बियाणे, शेती औजारे मिळतात.  शिवाय मोफत शिक्षण मिळते. दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र या सुविधांसाठी झगडावे लागते. नांदेड : सीमावर्ती भागात मागास जीवन जगत असलेल्या नागरिकांनी सुविधा देण्याची ओरड करूनही महाराष्ट्र शासन गांभीर्याने घेत नसल्याने जिल्ह्यातील सहा तालुक्यातील गावांनी तेलंगणात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कृती समितीही स्थापन करण्यात आली असून, हा प्रश्न चिघळू शकतो.  
 
२०१८ पासून प्रश्न मांडत आहोत. चार हजार कुटुंबीयांचे तेलंगणात झालेले स्थलांतरही शासन थांबवू शकले नाही. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ, असे समितीचे गोविंद मुंडकर यांनी सांगितले.
 
कोणते तालुके, काय आहेत मागण्या?
 
१६ तालुके असलेल्या नांदेड जिल्ह्यात माहुर, उमरी, देगलूर, बिलोली, किनवट, धर्माबाद हे सहा तालुके तेलंगणाला जोडून आहेत. रस्ते, वीज, पाणी यासारख्या समस्या येथे आहेत. तेलंगणातील नागरिकांना सर्व सुविधा मिळतात. तेथील सरकार मजूर, नोकरदार आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी राहते, असे या भागातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मोफत वीज, पाणी, बियाणे, शेती औजारे मिळतात.  शिवाय मोफत शिक्षण मिळते. दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र या सुविधांसाठी झगडावे लागते.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor